आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाची धडक मोहिम



शहरातील चार दुकानांवर कारवाई
अमरावती, दि. 23 : जिल्ह्यात कलम 144 लागू असताना व बंदीचा सुस्पष्ट आदेश असताना दुकाने चालू ठेवल्याबद्दल शहरातील चार दुकानांवर महापालिकेच्या पथकांनी कारवाई करत दुकाने सील केली आहेत.
            आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. तथापि बडनेरा रोडवरील पाटमासे स्टील, साई ऑटो एजन्सी, मोची गल्ली येथील फैजल अब्बास कटलरी स्टोअर्स व मोर्शी रस्त्यावरील एक पानठेला अन्न पदार्थांच्या नावाखाली कटलरी व स्टेशनरी वस्तू विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पालिकेच्या पथकानी ही दुकाने सील केली आहेत.
            महापालिकेच्या क्षेत्रात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली एक, अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोन, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक अशी चार पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके आदेशाचा भंग होऊ नये, यासाठी शहरभर नजर ठेवून आहेत.  
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती