विविध तरतुदींसह संचारबंदी आदेश जारी


जीवनावश्यक वस्तूखरेदीविक्रीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12

          अमरावती, दि. 24 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (2) अन्वये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदीच्या आदेशात काही नव्या तरतुदींचा समावेश करून आदेश जारी केला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 अशी निश्चित करण्यात आली आहे. हे आदेश 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. 
 औषधी केंद्रे व रूग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. धान्य, किराणा, फळे, भाजीपाल्याची विक्री महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या जागेतच करावी लागेल. या ठिकाणी 100 मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेशात नमूद आहे.
ग्रामीण भागातही लागू
या आदेशानुसार शहरी, तसेच ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी, जमावाने एकत्रित जमू नये. अनावश्यकरीत्या गावात शिरू नये किंवा फिरू नये. घरात वास्तव्य करावे. अमरावती शहरातील व अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील हद्दी बंद करण्यात येत आहेत. अत्यावश्यक वस्तू-सेवांना हे लागू होणार नाही.
टॅक्सीत दोन;रिक्षात एकच प्रवासी
सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक, त्यात शहर बससेवेवरही बंदी  घालण्यात येत आहे. विशेष कारणांसाठी टॅक्सीमध्ये चालकासह दोन प्रवासी व ऑटोरिक्षामध्ये चालकासह एक प्रवासी बसू शकेल. वैद्यक सेवा व आपत्कालीन सेवेतील वाहतुकीस मुभा आहे. खासगी वाहनाला  एक प्रवासी व चालकांसह अत्यावश्यक वस्तूसाठी व आरोग्य सेवांसाठी व इतर अत्यावश्यक कारणासाठी नेण्याची मुभा राहील.
अपप्रचाराला प्रतिबंध
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकाने समाजामध्ये अफवा, अपप्रचार व भीती निर्माण होईल, अशा प्रतिक्रिया व्हाटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग्ज आदीद्वारे प्रसारित करू नये. अपप्रचाराच्या हेतूने कोणताही व्हिडीओ, फोटो प्रसारित करून अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही विशेष प्रकारे महाआरती, समूहपठण, धर्मपरिषदांचे आयोजनाचे कृत्य व विधी करू नये. मिरवणूका, सभा, रॅली, सामूहिक कार्यक्रम, भाषणबाजी, उद्घोषणेला प्रतिबंध आहे. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे यांनाही आदेश लागू आहे. प्रार्थनास्थळांवर पूजाअर्चा पाचपेक्षा कमी व्यक्तींद्वारा सुरू राहील.
          अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी प्रकारची सर्व वाहतूक, एस. टी. बसेसची सेवा, महापालिका हद्दीतील बससेवा, ऑटोरिक्षाची सेवा बंद राहील मात्र, आपत्कालीन परिस्थितीत व रूग्णांच्या सेवेसाठी नागरिकांना रिक्षाची सेवा व स्वत:च्या खासगी वाहनाची सेवा घेण्याची मुभा राहील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठीच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात वाहतुकीची सेवा सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणा-या ट्रक, मालमोटारी, रिक्षा वाहने यांना मुभा राहील.
                   शासकीय, निमशासकीय कार्यालयात आवश्यक कामांसाठी येणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना शासन निर्देशान्वये पाच टक्के कर्मचारी उपस्थितीसाठी वगळण्यात आले आहे.
विलगीकरण केलेल्या व हातावर शिक्के असलेल्या नागरिकांनी पुढील 15 दिवस घराबाहेर पडू नये व घरात सुद्धा वेगळे राहावे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवेसाठी व रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी वैद्यकीय कारणांसाठी मुभा आहे.
सर्व नागरिकांना अनावश्यकरीत्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणांशिवाय येण्यास मनाई राहील. नागरिकांना आवश्यक असणा-या जीवनावश्यक वस्तूंचा साठा किंवा काळा बाजार करण्यात येऊ नये. वस्तूवर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद राहतील.  सर्व प्रतिष्ठाने, चांदी- सोने दुकाने, कापड, ऑटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड, मोबाईल दुकाने, सलून, ब्युटीपार्लर, गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, लॉज, ढाबे, चहा-नाश्ता दुकाने, पानटपरी, जलतरण उद्यान, बगिचे, मॉल्स, कोचिंग क्लासेस, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, खासगी गोदामे, कारखाने, उद्योग केंद्र व इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने या संचारबंदीत बंद राहतील, तथापि, तांदूळ व डाळ, अन्नधान्य, दुग्ध उत्पादने व इतर अत्यावश्यक वस्तू निर्मितीचे उद्योग यांना मुभा राहील.
शासकीय कार्यालये, अत्यावश्यक वस्तू विक्री दुकाने व प्रतिष्ठान यांनी शिथीलतेच्या काळात कमीत कमी कर्मचा-यांचा वापर करावा. सहका-यांमध्ये कमीत कमी 3 फुटांचे अंतर एकमेकांपासून ठेवावे व परिसरात स्वच्छता व हात धुण्यासाठी सुविधा ठेवाव्यात.
या आदेशाचा भंग भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार शिक्षापात्र अपराध मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशी बाब निदर्शनास येताच पोलीसांनी अशी कारवाई तत्काळ करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यावश्यक वस्तू  सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
1. बॅंका/ एटीएम, विमा,  वित्तीय तांत्रिक सेवा आणि अन्य संबंधित सेवा
2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
4. त्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
5. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
6.अत्यावश्यक वस्तू. त्यातील धान्य, खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासह अत्यावश्यक वस्तूंचे -कॉमर्सद्वारे वितरण
7.खाद्य पदार्थ,दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
8. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा, घरपोच जेवण पोहोचविणारे व्यावसायिक, सेवाधारी
10. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
12. त्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
13. त्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी स्थापने, रुग्णालये, वैद्यकीय सेवा
14. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
15. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळणावर  
निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी क्षात घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
                             000


Attachments area

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती