Saturday, March 21, 2020

बँका व वित्तीय संस्थाबंद राहणार नाहीत


मुंबई, दि. 20 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश   शासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना यातून वगळण्यात आल्या आहे.

राज्यशासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांना 31 मार्च पर्यंतच्या खासगी आस्थापना बंदीतून वगळण्यात आले असून या वित्तीय संस्थांचे कामकाज सुरु असणार आहे.

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...