एसडीएफ स्कूलला २५ हजार दंड


दंडाची रक्कम संसर्ग प्रतिबंध कार्यासाठी वापरण्याचे निर्देश

अमरावती, २५ : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शाळा बंद  करण्याचे सुस्पष्ट आदेश असतानाही येथील एसडीएफ ही शाळा सुरू असल्याच १८ मार्च रोजीे निदर्शनास आले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन  कायद्याच्या कलम 35 अन्वये पंचवीस हजार रुपये दंड या शाळेकडून आकारण्यात येणार आहे

तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
सदर दंडाची रक्कम तीन दिवसाच्या आत महानगरपालिकेकडे भरणा करावी महानगरपालिकेने सदर रकमेचा उपयोग कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांसाठी करावा असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

सदर शाळा अमरावतीतील वृंदावन कॉलनीत असून 18 मार्चला ती सुरू असल्याचे उपशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले. त्यावरून शाळेला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला.

या खुलाश्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी नमूद केले की, 18 मार्चला इयत्ता दहावी या वर्गाचे नवीन पुस्तकांचे संच घेण्यासाठी काही विद्यार्थी व पालक शाळेत आले होते व त्यांना ते देण्यात देखील आले. या खुलाश्या वरूनच 18 मार्च रोजी शाळा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुलासा असमाधानकारक असल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती