Monday, March 23, 2020

जिल्ह्यात संचारबंदी




                        जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी
अमरावती, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (2) अन्वये आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला असून, त्यानुसार जिल्ह्यात  31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार धान्य, किराणा, फळे, भाजीपाला या वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतच करता येईल. औषधी केंद्रे व रूग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. धान्य, किराणा, फळे, भाजीपाल्याची विक्री महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या जागेतच करावी लागेल. या ठिकाणी 100 मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेशात नमूद आहे.
जिल्ह्याच्या सीमेवरून प्रवेश करणा-या वाहनांना प्रतिबंधित करण्यासाठी सर्व सीमावर्ती ठिकाणी पोलीस अधिक्षक यांनी नाकेबंदी करून वाहनांना प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करावा. शहराच्या सीमेवर पोलीस आयुक्त यांनी नाकेबंदी करून वाहने रोखून त्यांना शहरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करावा. पेट्रोलिअम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, प्रसारमाध्यमांची वाहने यांना यातून वगळण्यात आले आहे.
जिल्हा, शहर व गावाच्या क्षेत्रातून आवश्यक व तातडीच्या वैद्यकीय, जीवनावश्यक व आपत्कालीन  परिस्थितीव्यतिरिक्त नागरिक व वाहनांना बाहेर जाण्यास व आत प्रवेश देण्यात येऊ नये.
अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारची प्रवासी व माल वाहतूक करणारी वाहने, बस, खासगी कार, टेंपो ट्रॅव्हलर, ट्रक, काळीपिवळी जीप, अशी सर्व हलकी व मध्यम, अवजड वाहने, ऑटोरिक्षा, शेअर रिक्षा, दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. पोलीस विभागाने प्रादेशिक परिवहन विभाग व महामार्ग पोलीस विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...