Sunday, March 22, 2020

जिल्ह्यात कलम १४४ लागू



         *_जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता इतर दुकाने ३१ पर्यँत बंद_*

                                     - *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*
अमरावती, दि. २२ :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील शहरी भागात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज लागू केला. 
त्यानुसार, सोने-चांदी ची दुकाने, कापड, ऑटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड, मोबाईल दुकाने, सलुन, ब्युटी पार्लर, गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, लॉज, चहा-नाश्ता प्रतिष्ठाने, पानटपरी, जलतरण तलाव, उद्यान, बगीचे, मॉल्स, कोचिंग क्लासेस, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व इतर सर्व दुकाने 31 मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.

*जीवनावश्यक वस्तू कायद्यात येणारी किराणा, धान्य दुकाने, औषधी केंद्रे, औषधालय, दूध, भाजीपाला, वैद्यकीय उपकरणे सेवा, पेट्रोलियम पदार्थ व त्यांची वाहतूक, बँक व वित्तीय सेवा, रुग्णालय, दवाखाने, अंत्यविधी क्रिया, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छताविषयक सेवा, टेलिफोन, इंटरनेट सेवा, डाक सेवा, प्रसारमाध्यमे व इतर अत्यावश्यक असलेल्या सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे*. 
या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमावाने एकत्रित जमू नये. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजामध्ये _अफवा, अपप्रचार व भीती निर्माण होईल अशा प्रतिक्रिया व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मिडीया, होर्डिंग इत्यादीवर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये_ . अपप्रचाराच्या हेतूने कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ फोटो प्रसारित करून अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही विशेष प्रकारे महाआरती, समूह, पठण, धर्म परिषदांचे आयोजन करू नये. मिरवणुका, रॅली, सामूहिक कार्यक्रम, भाषण बाजी यांना या आदेशाद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा देश सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे यांना सुद्धा लागू राहील.  
_प्रार्थनास्थळांवर प्रार्थना पूजा पाचपेक्षा कमी व्यक्तीद्वारा सुरू राहील पण अशी धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील_ . अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एसटी बसेस बंद राहतील. जीवनावश्यक कारणांसाठी शहरांतर्गत बससेवा सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक व वाहने यांची सेवा वगळण्यात आली आहे. 

*हा आदेश संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये लागू राहील.* शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक त्या कामांकरिता _*केवळ पाच टक्के कर्मचारी*–उपस्थित राहतील. ज्या नागरिकांचे विलगीकरण केले आहे व त्यांच्या हातावर शिक्का आहे, त्यांनी पुढील पंधरा दिवस घराबाहेर पडू नये व घरात सुद्धा वेगळे राहावे. 

सर्व नागरिकांना अनावश्यकरीत्या सार्वजनिक ठिकाणी विविध कारणाशिवाय येण्यास मनाई करण्यात येईल. _नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचा साठा अथवा काळाबाजार करण्यात येऊ नये तसेच या जीवनावश्यक वस्तू वाढीव दराने सुद्धा विकण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे_.

 या आदेशाचा भंग झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानून संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची बाब आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. 

_*साथरोग निवारणासाठी आवश्यक दक्षतेसाठी ही पावले उचलली असून, नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करावे. स्वतः सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे*_.
       ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...