मेळघाटात रॅपिड रिस्पॉन्स टीम - सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी



अमरावती,  दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातर्फे मेळघाटात दुर्गम क्षेत्रात रॅपिड रिस्पॉन्स टीमची निर्मिती व जनजागृती मोहिम करण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली.
            प्रकल्प कार्यालयातर्फे धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कार्यशाळा घेण्यात आली, तसेच दोन रॅपिड रिस्पॉन्स टीम बनविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा यासाठी गावोगाव आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामपंचायती, महत्वाची ठिकाणे आदी ठिकाणी सूचना, संदेशफलक लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, विविध माध्यमांतून जनजागृती होत आहे. याबाबत सहायक जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी आवाहन केले असून, त्याची चित्रफीतही सर्वदूर प्रसारित करण्यात आली आहे.
            नागरिकांना आरोग्य दक्षतेबाबत माहिती देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय व प्रकल्प कार्यालयातर्फे अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून कार्यवाही होत आहे. विविध कार्यालयांतून हँड वॉशची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी हात धुणे, हस्तांदोलन टाळणे, गर्दी टाळणे याबाबत विविध माध्यमांतून जनजागृती होत आहे.
                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती