Friday, March 27, 2020

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सूचनांचे पालन होत नसल्यास कायदेशीर कारवाई करावी
अनावश्यक बलप्रयोगाची गरज नाही
नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी
-
नागरिकांच्या सुविधेसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवठा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात आला आहे. तथापि, गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना पब्लिक अनाऊन्सिंग यंत्रणेद्वारे आवाहन करावे. अनावश्यक बलप्रयोग करण्याची आवश्यकता नाही. कुणी सूचनांचे पालन करत नसेल तर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
जीवनावश्यक वस्तू सेवा पूर्णवेळ सुरू
किराणा माल
भाजीपाला- फळे
दूध – अंडी
कृषी सेवा केंद्र, किरकोळ पशुखाद्य विक्री केंद्र
वरील सेवा पुरविणारी दुकाने सुरू राहतील. वरील मालाच्या वाहतुकीच्या रिकाम्या/भरलेल्या गाड्या, दुकान माल, दुकानात काम करणारे कामगार- मदतनीस यात समाविष्ट आहेत.
अत्यावश्यक सुविधा (पूर्णवेळ सुरू राहतील)
1. वैद्यकीय सेवा – सरकारी/खासगी डॉक्टर, नर्स, सिस्टर
2. सफाई कर्मचारी- सर्व प्रकारची रूग्णालये, कार्यालये, नगरपालिका,
जिल्हा परिषद व इतर
3. बँक कर्मचारी – सर्व बँका, पतपेढ्या आदी
4. सुरक्षा कर्मचारी- खासगी व सरकारी दोन्ही सिक्युरिटी गार्ड
5. वीज वितरणाशी संबंधित सेवा
6. पाणी पुरवठा विभाग
7. अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे कर्मचारी, मालक, सुपरवायझर
आदी
8. शेतमालक, शेतमजूर, शेती कामाशी संबंधित
9. पत्रकार, त्यांचे फोटोग्राफर
10. अ. औषधे तयार करणा-या कंपन्या
ब. खाद्य पदार्थ तयार करणा-या कंपन्या
क. स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी तयार करणा-या कंपन्या
या सर्व ठिकाणी काम करणारे लोक, मॅनेजर, कामगार, कच्चा माल पुरविणारे सुरक्षारक्षक यांना वाहतूक करणारे ट्रक, पिकअप समाविष्ट आहे.
11. इंटरनेट सुविधांशी संबंधित कर्मचारी
12. टेलिफोन संबंधित कर्मचारी
13. अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी
14. तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी जाणारे लोक व त्यांचे वाहन, गर्भवती
महिला, डायलिसीस रूग्ण, अत्यवस्थ रूग्ण, शस्त्रक्रियेसाठी न्यावयाचे
रूग्ण
15. सर्व रूग्णवाहिका व शववाहिका
16. गॅस सिलेंडर
याव्यतिरिक्त अनावश्यक कारणांसाठी कुणीही बाहेर पडू नये. कोरोना संसर्ग विषाणू प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घ्यावी.
गर्दी टाळा, दक्षता पाळा
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...