सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील
कार्यालयातर्फे विविध दाखल्यांचे वितरण
अमरावती, दि. 29 : सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयातर्फे प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करत, विविध दाखले वितरणाचा कार्यक्रम वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे घेण्यात आला. अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शासनाच्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत तहसील कार्यालय अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने 51 पात्र लाभार्थी यांना सातबारा वितरण,64 लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरण,संजय गांधी योजना /विशेष सहाय्य योजनेच्या 24 लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वितरण,महावितरण अंतर्गत नवीन वीज पुरवठा लाभार्थी तसेच नावात बदल करण्यात आलेल्या ग्राहकांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
नायब तहसीलदार श्रीमती ठाकरे, निरीक्षण अधिकारी जितेंद्र पाटील,मंडळ अधिकारी राजेश दंडाळे,गावनेर,उगले, जोगी मॅडम,सांगळे मॅडम ,तलाठी पवन राठोड, बाहेकर,पाऊलझगडे मॅडम, भोंबे मॅडम,जाधव मॅडम,कपिले मॅडम व इतर तलाठी,कोतवाल उपस्थित होते.
०००






No comments:
Post a Comment