Wednesday, September 21, 2022

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी मार्जिन मनी योजनेबाबत बँकांना मार्गदर्शन

 अनुसूचित जाती व नवबौध्द समाजासाठी

मार्जिन मनी योजनेबाबत बँकांना मार्गदर्शन

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र शासनाने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीसाठी सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना दहा टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एण्ड सबसिडी 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात नुकतीच जिल्ह्यांतर्गत लिड बँक, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा समन्वयक अधिकारी यांची सभा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घटकातील लाभार्थ्यांची प्रकरणे, त्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत करणे तसेच प्रत्येक बँकेने किमान एक प्रस्ताव मंजूर करण्याबाबत बँकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...