सेवा
पंधरवड्याचा अमरावती विभागात शुभारंभ
नागरिकांनी
लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती दि.17
(विमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा
पंधरवडा या उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त कार्यालयात आज करण्यात आला. त्यात आजपासून
गांधीजयंती अर्थात दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत विविध विभागांकडील दि. 10 सप्टेंबरपर्यंतची
सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.
विभागीय आयुक्त
कार्यालयात उपायुक्त संजय पवार व उपायुक्त अजय लहाने यांच्या हस्ते उपक्रमाच्या फलकाचे
अनावरण होऊन विभागस्तरीय शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार वैशाली पाथरे, निकीता जावरकर,
नायब तहसीलदार मधुकर धुळे, राजेश चौधरी, प्रशांत अडसुळे, शुभांगी चौधरी यांच्यासह अधिकारी
कर्मचारी उपस्थित होते.
अनेक प्रकरणी
नागरिकांचे अर्ज व तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत निपटारा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर
सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार आपले सरकार पोर्टल ( 392 सेवा),
महावितरण पोर्टल (24 सेवा), डीबीटी पोर्टल (46 सेवा),नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात
येणाऱ्या सर्व शासकीय सेवा, विविध विभागांचे स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील
प्रलंबित अर्ज व त्या व्यतिरिक्त 14 सेवांच्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा पाचही जिल्ह्यातील
सर्व यंत्रणांनी करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.
निपटारा न झालेल्या
प्रकरणी स्वयंस्पष्ट कारणासह प्रमाणपत्र प्रत्येक विभागाला सादर करावे लागणार आहे.
पंधरवड्यात सर्व प्रलंबित अर्ज निकाली निघणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचा
लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.
यावेळी अधिकारी
स्मिता दळवी, अव्वल कारकून दिप्ती गावंडे, सजल जावरकर, प्रिया काटोले, संतोष चव्हाण,
अमोल साळुंखे, संतोष नटवे, दिवाकर कठाणे, शशिकांत जामनिक, सचिन पवार, विलास मानकर,
वैभव ठाकरे, पंकज सदानपुरे, रोहिदासआप्पा पाटील, पी.बी. काळे, यु. व्ही. काळे, प्रतिक
पावळे, तुषार अंधारे, पंकज भोंडे, सुनील उबाळे, प्रकाश देशपांडे, राहुल जुमळे, पवन
चेचरे, ए. आर. पात्रे, जी. आर. मिसाळ, व्ही.एन. वैद्य, एस. एस. ढवळे, प्रफुल्ल सोनार
आदी उपस्थित होते.
00000

.jpeg)

No comments:
Post a Comment