Wednesday, September 14, 2022

‘आयटीआय’ मध्ये शुक्रवारी शिकाऊ भरती मेळावा

                                                                                  

‘आयटीआय’ मध्ये शुक्रवारी शिकाऊ भरती मेळावा

अमरावती, दि.14 (विमाका):-  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भरती मेळाव्यात व्हील्स इंडिया पुणे, रोनक पॉलिमर्स पुणे, महाले आनंद चाकन, पुणे, स्पयसर इंडिया चाकन, पुणे, आय. टी. डब्लू. इंडिया सानेवाडी, पुणे, जाधव गीयर्स लिमिटेड, अमरावती, एनआरबी, वालूज, औरंगाबाद, स्लीक इंटरनॅशनल पुणे, टाटा ऑटो कंपनी पुणे, महिन्द्रा ॲड महिंन्द्रा, चाकन, पुणे, जाबिल सर्किट इंडिया पुणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण, प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणार आहे, असे संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी.देशमुख यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...