Thursday, September 15, 2022

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत 21 सप्‍टेंबरला गनर डे

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत 21 सप्‍टेंबरला गनर डे

* माजी सैनिकांच्या समस्या सोडविणार

अमरावती, दि.15 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच दिवंगत सैनिकांच्या पत्नी व त्यांचे पाल्य यांच्या समस्या सोडविण्यासाठी 21 सप्टेंबरला गनर डे आयोजित केला आहे. ओ.पी.हिल  अर्थात 169 मध्यम तोफखान्याचा 196 वा गनर डे साजरा करण्यात येणार आहे. या युनिटची टीम सायं 5 वाजता कार्यालयात उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये मेजर अभिनंदन शिरोटे (मो.नं. 8716916913) व कॅप्टन जे बी एस धिंडसा (मो.नं.9478688877) हे 12 जवानांसह उपस्थित असतील.  

यावेळी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी  मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...