नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला व स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

 नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला व

स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

 

अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

 

अमरावती, दि.02: महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व  स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी 8 मार्च रोजी नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

इच्छुक महिला व स्वयंसेवी संस्था यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आपले अर्ज व नामनिर्देशन आवश्यक त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईन पध्दतीने www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.पुरस्कारासाठी अर्ज व नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ‘दत्तात्रय सदन’, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती, भ्रमणध्वनी क्रमांक 0721-2990412 येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती