जात पडताळणीबाबत ‘एसडीओं’ना ऑनलाईन मार्गदर्शन

 

जात पडताळणीबाबत ‘एसडीओं’ना ऑनलाईन मार्गदर्शन

 

      अमरावती, दि.23  : सेवा पंधरवड्यानिमित्त विभागीय जात पडताळणी समितीमार्फत अमरावती, अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेबाबत ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

            समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, उपायुक्त तथा सदस्य जया राऊत व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव दीपा हेरोळे हे हजर होते.

            श्री. कुर्तकोटी यांनी जातीच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने माहिती दिली व विविध प्रश्नांचे निरसन केले. विधी अधिकारी रितू तराळ यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत संशयास्पद जाती दाव्यांबाबत व न्यायनिवाड्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अमन नाचोणे, शालिनी गायगोले यांनी सहकार्य केले,

            अमरावती, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, धारणी, चांदुर रेल्वे, भातकुली, अकोला, मुर्तिजापूर, अकोट, बाळापूर येथील अधिकारी प्रशिक्षणास उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती