Tuesday, September 13, 2022

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र धोरणांचे वाढदिवस थाटामाटात साजरे! महिला बाल विकास विभागांचा अभिनव उपक्रम: अविष्यांत पंडा








जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र धोरणांचे वाढदिवस थाटामाटात साजरे!

महिला बाल विकास विभागांचा अभिनव उपक्रम: अविष्यांत पंडा

 

            राष्ट्रीय पोषण महा निमित्त अमरावती जिल्ह्यात कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये गावातील वृद्ध नागरिकांचा वाढदिवस मोठ्या मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील वृद्ध नागरिकांना अंगणवाडी केंद्रात बोलवून त्यांचे औक्षवन करण्यात आले आणि केक कापून वृद्धांचे  वाढदिवस साजरे करण्यात आले.

            एक सप्टेंबर पासून अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडी केंद्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी महिला बाल विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा  यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन केले असून अंगणवाडी केंद्रामध्ये विविध उपक्रम साजरी करणे, जसे स्वच्छता हीच सेवा, एक दिवस मेळघाटासाठी, वृद्धांचे वाढदिवस, सासवांची शाळा, गाव तिथे बंधारा अशा अनेक उपक्रमांची नियोजन करण्यात आले आहे . या अंतर्गत आज गावागावातील अंगणवाडी केंद्रात गावातील वृद्ध नागरिकांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरे करण्यात आले. यावेळी ज्या वृद्ध व्यक्तींनी आपले वाढदिवस कधीही साजरी केले नव्हते आणि केक कापला नव्हता अशा वृद्धांनी आज केक कापून वाढदिवस साजरा करताना त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत  होते. त्यांनी अंगणवाडी केंद्राबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. सप्टेंबर महिन्यामध्ये महिला बालविकास विभाग मार्फत जे जे कार्यक्रमात होतात त्याचे केंद्र शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाइन सुद्धा नोंदी करण्यात येतात.  यातून महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण कार्यक्रम राबविले जातात त्यांना  मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात येते. गेल्या वर्षी अमरावती जिल्ह्याने याच बाबतीत दोन बक्षीस पटकावले होते हे विशेष!

           यावर्षी सुद्धा अमरावती जिल्हा राष्ट्रीय पोषण महा निमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवत असून आपला एक वेगळा ठसा राज्यामध्ये उमटवीत आहे. यासाठी डॉ.कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास हे सातत्याने अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या संपर्कात असून अतिशय बारकाईने सर्व कार्यक्रमाचे अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देऊन आहेत. अमरावती जिल्ह्यांच्या या सगळ्या वेगळ्या उपक्रमांचे सर्व गावातून कौतुक होत असून त्यांची राज्यस्तरावर सुद्धा दखल घेण्यात येत आहे.

 

    "वृद्धांचे वाढदिवस हा एक अभिनव उपक्रम असून यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान दिसून येते त्यातून एक वेगळा आनंद मिळतो. त्यामुळे अमरावती जिल्हा मार्फत अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. याची राज्यस्तरावर सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे."

     ...... डा.कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

"माझे वय 70 वर्षे आहे.आमच्यासाठी हा खूप आनंदाचा आणि आठवणीत राहील असा दिवस आहे. अंगणवाडी ताईने आमच्यासाठी केक बनवला. अंगणवाडी केंद्र सजवले.आम्हाला केक खाऊ घातला. आमची ओवाळणी केली. अशा प्रकारचा दिवस जीवनात पुन्हा येणार नाही असे वाटते. त्यासाठी सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते.धन्यवाद देते."

            ...... श्रीमती सीताय सानू दहीकर, मोथा तालुका चिखलदरा


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...