Thursday, September 22, 2022

महिला सक्षमीकरण रॅलीत चारशेहुन अधिक विद्यार्थींनींचा सहभाग

 




महिला सक्षमीकरण रॅलीत

चारशेहुन अधिक विद्यार्थींनींचा सहभाग

 

 

अमरावती, दि.22 (जिमाका): शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आज काढण्यात आली. त्यात विविध शाळांच्या चारशेहुन अधिक विद्यार्थीनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

 

विभागीय ग्रंथालयाच्या प्रांगणात माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम देशपांडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक अरविंद ढोणे, निरीक्षक दिपक गेडाम, राजाराम देवकर, धनंजय वानखेडे, रेखा राऊत आदी उपस्थित होते.

 

ग्रंथालयापासुन रॅली इर्विन चौकात आल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे कॅम्प रस्त्यावरून गर्ल्स हायस्कुल चौकातुन रॅली जात जि.प. कन्या माध्यमिक शाळेत समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शुभारंभापूर्वी ग्रंथालयाच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात श्री पवार, श्रीमती भाकरे, श्रीमती पवार यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. होलीक्रॉस मराठी विद्यालय, जिप कन्या माध्यमिक शाळा, ज्ञानमाता विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला.  

 

*****

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...