पदवीधर मतदार संघ निवडणूक सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 





पदवीधर मतदार संघ निवडणूक

सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्व कार्यालयातील कार्यरत पदवीधरांनी मतदारांनी नोंदणी करुन घ्यावी. ती पूर्ण होण्यासाठी कार्यलय प्रमुखांना प्रयत्न करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

 

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत विविध कार्यालय प्रमुखांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार म्हणून शंभर टक्के नोंदणी करुन घ्यावी. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार नोंदणीसाठीचा नमुना 18 विहीत शैक्षणिक पात्रता असल्याचा कागदोपत्री पुराव्यासह कार्यालय प्रमुख यांचेकडे सादर करावा. संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवयश्यक वाटेल त्याप्रमाणे कागदोपत्री पुराव्याची पडताळणी करावी. तसेच शासकीय कार्यालयाच्या राजपत्रित प्रमुखांच्या अभिरक्षेतील शासकीय नोंदीच्या आधारे तिसऱ्या अनुसूचितील विहीत नमुन्यामध्ये कार्यालयातील कार्यालय प्रमुख अधिकारी यांनी पदवीधर कर्मचाऱ्यांना दिलेले प्रमाणपत्रासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे एकत्रित अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करता येईल.

 

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती