Friday, September 2, 2022

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर

 आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहासाठी

अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर

अमरावती, दि.2: मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, वलगाव रोड, अमरावती येथे सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात एकुण  60 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे आहेत. वसतिगृहाच्या प्रवेशासाठी आता 8 सप्टेंबर 2022 पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन गृहप्रमुखांनी केले आहे.

माध्यमिक विभागातील 12 विद्यार्थी, उच्च माध्यमिक विभागातील 18 विद्यार्थी, महाविद्यालयीन विभागातील 18 विद्यार्थी आणि तंत्रशिक्षण विभागातील 12 विद्यार्थी असे एकुण 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. हे प्रवेश ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न 2021-22 मधील एक लाख रूपयांच्या आत असेल, त्याच पाल्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. प्रवेशीत पाल्य विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये फक्त राहण्याची व जेवणाची मोफत सोय केल्या जाईल. अन्य कोणत्याही इतर सुविधा देण्यात येणार नाहीत.

वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वलगाव रोड, अमरावती येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत विनामुल्य प्राप्त होतील.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...