एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात अर्ज आमंत्रित

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 12 : एकत्मिक फलोत्पादन विकास व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा या योजनेत समावेश आहे.

फुल शेतीसाठी अनुदान

फुले लागवडीत कट फ्लॉवर्ससाठी अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टर 1 लक्ष रुपये खर्च मर्यादा असून त्याच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान मिळेल. इतर शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये अनुदान मिळेल. कंदवर्गीय फुलांसाठी प्रति हेक्टर दीड लक्ष रु. खर्च मर्यादा असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये अनुदान मिळेल. इतर शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 37 हजार 500 रुपये अनुदान मिळेल. सुटी फुले या घटकासाठी प्रति हे. 40 हजार रु. खर्च मर्यादा असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये अनुदान मिळेल. इतर शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 10 हजार रुपये अनुदान मिळेल.

मसाला पिकांसाठी अनुदान

मसाला पिकांमध्ये बिया व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी प्रति हे. 30 हजार खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार रु. अनुदान मिळेल. बहुवार्षिक मसाला पिकांसाठी 50 हजार प्रति हे. खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. अनुदान मिळेल.

फळांसाठी अनुदान

            विदेशी फळ ‍पिकांमध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवी या फळांसाठी प्रति हे. 4 लक्ष मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किवा कमाल 1 लक्ष 60 हजार रु.  अनुदान मिळेल. स्ट्रॉबेरी या फळ पिकासाठी प्रति हे. 2 लक्ष 80 हजार मर्यादा असून एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 12 हजार रु. अनुदान मिळेल. पॅशनफ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकडो या फळांसाठी प्रति हे. 1 लक्ष खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 40 हजार प्रति हे. अनुदान मिळेल.

जुन्या बागांचे पुनरुज्जीवन

            जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 40 हजार प्रति हे. ऐवढी खर्च मर्यादा असून खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. अनुदान मिळेल.

            अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर फलोत्पादन या टॅबखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती