Friday, September 23, 2022

दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात लम्पी आजारावरील लसीकरण सुरु

 

दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात

लम्पी आजारावरील लसीकरण सुरु

 

अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. तो रोखण्यासाठी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये लसीकरण करण्यात येत आहे. जनावरांना लागण झालेल्या गावापासून पाच किमी अंतरातील सर्व गावांमध्ये नि:शुल्क लसीकरण सुरु आहे.

दर्यापूर तालुक्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी लम्पी आजारांची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास डॉ. निचळ (भ्रमणध्वनी क्रमांक 9850588358) तसेच डॉ. देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक 9423610775) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी सहायक आयुक्त डॉ. थोटे (भ्रमणध्वनी क्रमांक 8554897926) व डॉ. झोंबाडे (भ्रमणध्वनी क्रमांक 9423424197) यांच्याशी संपर्क साधावा. लक्षणे आढळून आलेल्या जनावरांचे फोटो, आपले नाव, संपूर्ण पत्ता वॉट्सअपव्दारे संबंधित पशु वैद्यकीय अधिकारी यांना पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 येथे संपर्क साधावा.

लम्पी आजाराची लक्षणे आढळून आलेल्या जनावरांना विलगीकरणात ठेवावे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांनी गोठ्याची फवारणी करुन परिसराचे निर्जंतूकीकरण करावे, असे आवाहन दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...