पीसीपीएनडीटी सेल कार्यालयाचा उपक्रम

 

पीसीपीएनडीटी सेल कार्यालयाचा उपक्रम

नवरात्री उत्सवात स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी करणार जागर

सार्वजनिक मंडळांच्या परिसरात विविध स्पर्धांचे आयोजन

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका): स्त्रीभ्रृण हत्या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवामध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये दुर्गोत्सव, शारदा उत्सव मंडळाच्या परिसरामध्ये रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी स्त्रीभ्रृण हत्त्येच्या परिणामावर आधारित देखावा स्पर्धा, स्त्रीभ्रृण जनजागृती प्रदर्शन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळांना बक्षिस देण्यात येतील. तसेच सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीपीएनडीटी सेल, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अमरावती येथे नोंदणी करावी.

            स्त्रीभ्रृण हत्येप्रती जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा समन्वय समितीमार्फत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            या कालावधीत जिल्हा स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र संघटनेमार्फत आरोग्य मेळावे व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी याविषयावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मंडळाची मागणी असल्यास इतरही ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येतील. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती