मध केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 मध केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे.

या योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते.

या योजनेत वैयक्तिक मधपाळासाठी साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा. शेती असल्यास प्राधान्य मिळेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती वय 21 वर्षापेक्षा जास्त व दहावी उत्तीर्ण असावी. व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

केंद्रचालक संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेची किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती दूरध्वनी क्र. 0721-2662762 किंवा पी. के. आसोलकर मधुक्षेत्रिक भ्रमणध्वनी क्रमांक 8208497189 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

                                                      0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती