Wednesday, September 21, 2022

लंपी प्रतिबंधक लसीच्या 2 लाख 60 हजार मात्रा उपलब्ध

 


लंपी प्रतिबंधक लसीच्या 2 लाख 60 हजार मात्रा उपलब्ध

 

अमरावती, दि. 21 (विमाका) : जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांच्या लंपी या आजारावरील प्रतिबंधक लसीच्या 2 लाख 60 हजार मात्रा उपलब्ध झाल्या असून,  बाधित क्षेत्रातील 1 लाख 83 हजार 893 जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांनी दिली.

            पशुपालकांनी घाबरुन जाण्याची गरज नसून योग्य दक्षतेने व उपचाराने हा रोग पूर्ण बरा होतो. पशुपालकांनी या रोगाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा अथवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. लसीकरण व औषधोपचार विनामूल्य आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...