अमरावती विमानतळाचा विकास ‘एमएडीसी’कडून
उद्योगांच्या विकासाला गती मिळेल
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 5 : अमरावती येथील बेलोरा विमानतळ उभारण्याचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या विमानतळामुळे अमरावती येथील वस्त्रोद्योग पार्क व इतर उद्योगांना लाभ होऊन विकासाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी व्यक्त केली.
बेलोरा विमानतळ उभारणीचे काम  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविताना कंपनीला शासनाकडून 75 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात 15 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.  २००९ मध्ये विमानतळाची जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर विशेष हेतू कंपनी म्हणून ‘एमएडीसी’ने भूसंपादन आणि इतर अनुषंगिक कामेही केली.  दरम्यान, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे विमानतळ विकासाचे काम सोपविण्यात आले होते. तथापि, प्राधिकरणाने असहमती कळविल्याने हे काम ‘एमएडीसी’कडे सोपविण्यात आले. कंपनीने हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावतीत वस्त्रोद्योग पार्कमध्ये रेमंडसारख्या नामांकित कंपन्यांनी प्रकल्प सुरु केले आहेत. औद्योगिक वसाहतीत इतरही अनेक उद्योगांची उभारणी होत आहे.  विमानतळ झाल्यावर उद्योगांच्या  विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी व्यक्त केला.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती