Wednesday, January 17, 2018


शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर शाळेचा दर्जा ठरावा
- विनोद तावडे
नवी दिल्ली, 16 : शाळा सिद्धी अंतर्गत शिक्षणाचा दर्जा हा शाळेतील पायाभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर ठरावा, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत मांडली.
दोन दिवसीय केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची (केब) 65 वी वार्षिक बैठकीचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले, आज पहिल्या दिवशी शालेय शिक्षणाविषयीची बैठक झाली, यावेळी श्री तावडे यांनी ही सूचना मांडली. बैठकीची अध्यक्षता केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, विविध राज्यातील शालेय शिक्षण मंत्रीकेंद्रीय शालेय शिक्षण सचिव, राज्यांतील शालेय शिक्षण सचिव उपस्थित होते.
शाळा सिद्धी अंतर्गत शाळेच्या पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष वेधले गेले आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावरच एखाद्या शाळेचा दर्जा ठरल्यास अधिक योग्य राहील, असे बैठकीत  सांगितले.  यासह अभ्यासक्रमांशी निगडीत नवीन प्रकल्प शाळेंमध्ये सुरू करण्यापूर्वी त्यावर नीट विचार व्हावा, कारण मध्येच एखादा प्रकल्प बंद पडल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शालेय शिक्षणांशी संबंधित नवीन धोरण ठरविताना राज्य शासनावर पडणा-या आर्थिक बोजाचा विचार व्हावा, अशा काही महत्वपूर्ण सूचना श्री. तावडे यांनी आजच्या बैठकीत मांडल्या.
याशिवाय राज्यात राबविण्यात येणा-या अभिनव उपक्रमांची माहिती श्री तावडे यांनी  यावेळी दिली. यामध्ये कलमापण चाचणी, दाहावीच्या विद्यार्थ्यांना नापास न करता एटिकेटीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणे अथवा कौशल्य विकासाचे प्रशिक्षण करण्याची अनुमती देणे यासह शाळा डिजीटल करण्यासाठी 350 कोटींचा निधी जनतेतून गोळा करण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास 95 % टक्के शाळा डिजीटल झालेल्या आहेत. सोबत समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, महाकरीयर मित्र या संकेत स्थळाच्यामाध्यमातून तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंच्या प्रशिक्षण संस्थांची माहिती देण्यात येत आहे,अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी यावेळी दिली.

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...