मुंबई शॉपिंग महोत्सवातून पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी चालना
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 12 - पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई शॉपिंग महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईबरोबर महाराष्ट्राच्या पर्यटनाला आणि येथील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.
बीकेसी येथील जिओ गार्डन येथे आज या महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेत्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटन मंत्री जयकुमार रावलआमदार प्रसाद लाडअप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशीपर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव 12 ते 31 जानेवारी दरम्यान चालणार आहे.
मुख्यमंत्री म्हणालेमुंबईचे आकर्षण जगभरात आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आयोजित केलेला हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरेल. या महोत्सवातून मुंबईचा एक ब्रँड प्रस्थापित होईल. दरवर्षी किमान 1 महिना हा महोत्सव घेण्यात यावाअसे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन मंत्र्यांचे केले अभिनंदन
मुंबईच्या पर्यटन आणि अर्थव्यस्थतेला चालना देणारी ही अभिनव संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.

शॉपिंग महोत्सवाला महामहोत्सव बनवू - जयकुमार रावल
मंत्री श्री. रावल यावेळी म्हणाले कीमुंबईत रिक्षापासून विमानापर्यंत तर वडापावपासून पंचतारांकित हॉटेलापर्यंत 360 डिग्री पद्धतीने सुविधा उपलब्ध आहेत. शॉपिंगसांस्कृतिक कार्यक्रमफूड स्टॉल अशा विविध माध्यमातून शॉपिंग महोत्सव हा सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे. यापुढील काळात हा लोकोत्सव आणि महामहोत्सव बनविण्यात येईलअसे ते म्हणाले.
यावेळी एमटीडीसीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती