Friday, January 5, 2018


डावखरे यांच्या निधनाने उमदा नेता गमावला : मुख्यमंत्री
मुंबई दि. 5 : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने राजकारणापलिकडे ऋणानुबंध जपणारा एक उमदा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. डावखरे यांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील जीवनप्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषत: विधानपरिषदेचे उपसभापतीपद प्रदीर्घ काळ सांभाळताना त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखले. राजकारण-समाजकारणासह कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कृती अशा साऱ्या क्षेत्रात त्यांचा समर्थ वावर होता. विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज चालवताना त्यांच्या संसदीय कौशल्यासह हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धीची नेहमीच प्रचिती येत असे. राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांसोबतच सर्व स्तरातील मोठा लोकसंग्रह हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
-----000-----

प्रेषक :

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...