Wednesday, January 24, 2018

महाराष्ट्रातील तुरंग अधिकाऱ्यांना सेवा पदक
नवी दिल्ली दि 24: देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ जणांचा यात समावेश आहे.
तुरंगसेवेत कैद्याच्या जीवनात चांगला बदल घडुवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक देण्यात येते. 
          पोलीस उपअधीक्षकपोलीस महानिरीक्षक,तुरुंग आणि सुधारात्मक सेवा कार्यालय श्री सुनील निवृत्ती धामल यांना यावर्षीचे सेवा पदक जाहीर झाले आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार धर्मराज नामदेव नाघाटेयेरवडा कारागृहाचे सुभेदार श्री आनंद शंकर हिरवेजालना जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री जगन्नाथ पांडुरंग खपसे,कोल्हापूर जिल्हा कारागृहाचे हवालदार श्री  संजय सखाराम घाणेकरअमरावती मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार श्री गजानन दिगंबर क्षीरसागर आणि औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई श्री सुभाष तोताराम तायडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...