सुभाष नावंदे याला सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक
नवी दिल्ली, 29 : पुण्यातील सुभाष नावंदे याला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी प्रधानमंत्री रॅली मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
          दिल्लीतील छावनीभागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी  पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख ऍडमिरल सुनील लांभा, नौसेना प्रमुख चिफ मार्शल बिरेंद्र सिंग  धनोआ आदी मंचावर  उपस्थित होते
एसीसीच्या श्रेणी अंतर्गत  पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटच सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्वेश हा  १९ वर्ष असून तो  मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी.एस.सी  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन 2018 च्या राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी पुणे येथे नाव नोंदविले.  नोव्हेंबर  2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेश ची निवड पुढील शिबीरासाठी औरंगाबाद येथे झाली. यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणा-या विविध अंतर्गत स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला. अंतिमत: तो प्रधानमंत्री रॅलीसाठी पात्र ठरला. सर्वेशची उत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्याने भारतातून वायुदल विंग मध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदकही  प्राप्त केले.   एनसीसीचे महासंचालक यांनीही सर्वेशचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.
             प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील कॅडेटसना संबोधित केले.           कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रधानमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसचा समावेश होता. प्रधानमंत्री यांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्यांच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले.
        एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन करयात येते. 6 जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न झाले. तर प्रधामंत्रीरॅलीने रविवारी या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे कॅडेट्स यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील ११2 एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील काही कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर काही कॅडेटसची  प्रधानमंत्री रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.   
            या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, प्रधानमंत्री रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी बजावली.



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती