पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
डोंगरयावलीच्या गारपीटग्रस्तांसाठी 1 कोटी 9 लाख रुपये नुकसानभरपाई

अमरावती, दि. 24 : मोर्शी तालुक्यातील डोंगरयावली येथील गारपीटग्रस्त शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्यासाठी 1 कोटी 9 लाख रुपये विभागीय आयुक्त कार्यालयाला वर्ग करुन ते तत्काळ वितरीत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसा शासन निर्णय आज जारी झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. दरम्यान, या मागणीसाठी सुरु असलेले उपोषणही पालकमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना विनंती करुन सोडविले.
डोंगरयावली येथे 2016 मध्ये झालेल्या गारपीटीमुळे संत्रा पीकाचे नुकसान झाले होते.  त्यासाठी सर्वक्षण व भरपाई जाहीर झाल्याने ती न मिळाल्याने शेतक-यांकडून उपोषण सुरु करण्यात आले होते. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मंत्रालय प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले, तसेच उपोषणकर्ते विक्रम ठाकरे व इतर उपोषणकर्त्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा करून उपोषण सोडण्याची विनंती केली व उपोषण सोडविले. सतत तीन दिवस लक्ष ठेवून पालकमंत्र्यांनी हा प्रश्न सोडविला. 
मोर्शी तालुक्यातील 624.97 हेक्टर शेती व फळपीकांच्या क्षेत्राचे नुकसान झाल्याने एकूण 659 खातेदार शेतक-यांना निधी वाटण्यासाठी 1 कोटी 9 लाख 2 हजार 690 रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केली होती.  हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वर्ग करुन अर्थसंकल्पीय प्रणालीवर (बीडीएस) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी शेतक-यांना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरीत करावा. प्रशासनाने तो शेतक-यांना वितरीत होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी दिले आहेत. 
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती