Monday, January 15, 2018

साज फूड प्रॉडक्टसच्या उत्पादन केंद्राचे
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
          नागपूरदि. 15 : बुटीबोरी औद्योगिक वसाहत क्षेत्रातील साज फूड प्रॉडक्टस प्रा. लिच्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार समीर मेघेविभागीय आयुक्त अनुप कुमारबुटीबोरीचे सरपंच अनिता ठाकरेकंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले कीसाज फूड प्रॉडक्टस प्रा.लीचे विदर्भात उत्पादन केंद्र सुरू होते आहे ही बाब आनंददायी आहे. विविध चवीच्या आणि प्रकारांच्या बिस्कीटांची देशात मोठी मागणी आहे. नागपूर येथील उत्पादन केंद्रात बिस्किट निर्मिती प्रक्रियेत स्वच्छता आणि उच्च दर्जा राखला जात आहे. मध्य भारतातही साज फूड प्रॉडक्टस कंपनी नक्कीच नाव मिळवेल. राज्य शासनाने कंपनीला मेगा स्टेट्स दर्जा दिलेला आहे. नागपूर येथील उत्पादन केंद्रामध्ये 1500 स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. विदर्भ व मराठवाड्यात उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
            साज फूड प्रॉडक्टसचे अध्यक्ष के.डी. पॉल म्हणालेनागपूरमध्ये साज फूड प्रॉडक्टस प्रा लीचे उत्पादन केंद्र सुरू होत असून नागपूर येथे सुरू होत असलेले हे पाचवे उत्पादन केंद्र आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येथील उत्पादन केंद्रात वापरले जाणार असून उत्पादनाचा दर्जा राखण्यावर भर देण्यात येईल. कंपनीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृती जोपासली जाते असेही श्री.पॉल यांनी सांगितले. 
००००


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...