Thursday, January 25, 2018

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत
    
  मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॅा. दीपक सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
         ही मुलाखत उद्या  (शुक्रवार) दि. २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत सक्षम आरोग्यसेवा’ या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
          शिवआरोग्य टेलीमेडीसिन,राज्यातील शासकीय आरोग्य संस्थासाठी कायापालट योजनेची अंमलबजावणीमोटार बाईक ॲम्ब्युलन्सची सेवाकेंद्र शासनाच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम २०१६ च्या अहवालात राज्यातील अर्भक व बालमृत्यू दरात तीन अंकानी घट झाल्याची  नोंदई हेल्थ सेंटर संकल्पना,मेमरी क्लिनीक याबाबतची सविस्तर माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...