Tuesday, January 9, 2018

श्रीक्षेत्र गहिनीनाथ, श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री संत मुक्ताई मंदिर
59.08 कोटीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

मुबंई, दि.9 : बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ  व श्री क्षेत्र नारायणगड  आणि  जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या एकूण 59.08 कोटीच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली.
             बीड जिल्हयातील श्री क्षेत्र नारायणगड या ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटीच्या  विकास आराखड्यातून मंदिर परिसरात दगडी फरशी बांधकाम,सार्वजनिक शौचालय,पाणी व जलव्यवस्थापन,सौर उर्जेवर आधारित विद्युतीकरण,घनकचरा  व सांडपाणी व्यवस्थापन,गोशाळा,सांस्कृतिक सभागृह यासह एकूण सतरा कामे प्रस्तावित आहेत.
 पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडासाठी देखील 25 कोटीच्या विकास आराखड्यातून बहुउद्देशीय सभागृह,संरक्षण भिंत, लहान मुलांसाठी बगिचा व उद्यान,पाणी जलव्यवस्थापन,अंतर्गत व बाह्य सौर उर्जा यंत्रणा,गोशाळा बांधकाम,पोलीस मदत केंद्रआदीसह एकवीस कामे प्रस्तावित आहेत.या दोन्ही आराखड्यास निधी उपलब्ध झाल्यानंतर तीन ते अठरा महिन्यांचा कालावधी लागेल, असे बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिर या ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या  विकासासाठी 9.08 कोटीच्या आराखडयास यावेळी मान्यता देण्यात आली.या निधीमधून अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी  दालन व अंशत: खुले भक्त निवास,सभामंडप व गर्भगृह,पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे,विद्युतीकरण, संगणकीकरण आदी कामे करण्यात येतील.

            या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर,ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार एकनाथ खडसे,विनायक मेटे,मुख्य सचिव सुमित मल्लिक,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...