Thursday, January 18, 2018

‘लोकराज्य’च्या  ‘आपले पोलीस- आपली अस्मिता’ विशेषांकाचे प्रकाशन
पोलीस दलाच्या अथक कामगिरीवर ‘लोकराज्य’मधून प्रकाश
- पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक
अमरावती. दि.18 : पोलीस अधिकारी-कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत असतात.  पोलीस दलाची ही अविरत व अथक कामगिरी ‘लोकराज्य’च्या ‘आपले पोलीस-आपली अस्मिता’ विशेषांकातून सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास विश्वास पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आज येथे व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाचा जानेवारी 2018 चा अंक ‘आपले पोलीस- आपली अस्मिता’ विशेषांक असून, त्याचे प्रकाशन पोलीस आयुक्तालयात श्री. मंडलिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. 
श्री. मंडलिक म्हणाले की, महाराष्ट्राच्या पोलीस दलाला गौरवशाली इतिहास आहे. त्यावर प्रकाश टाकतानाच लोकराज्यच्या विशेषांकातून  पोलीसांसाठीच्या योजना, सायबर गुन्हे, डिजिटल तपासाच्या स्मार्ट दिशा, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञानाच्या वापराची पद्धती आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा अंक पोलीस, विद्यार्थी, अभ्यासकांसह सर्वांना उपयुक्त ठरेल. हा अंक जिल्ह्यात सर्वत्र स्टॉलवर उपलब्ध असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...