महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या
इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना
अमरावती दि.4 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व मे-जून 2023 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यत) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. दि. 7 नोव्हेंबर (रात्री 11.59 वाजेपर्यंत) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 18 नोव्हेंबपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात सादर करावे.
उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-scc.ac.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासंबंधीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास गरड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment