Thursday, April 20, 2023

माजी सैनिकांसाठी सुवर्णसंधी आंध्र विद्यापीठाकडून कला शाखेची पदवी मिळणार

 माजी सैनिकांसाठी सुवर्णसंधी

आंध्र विद्यापीठाकडून कला शाखेची पदवी मिळणार

 

अमरावती, दि. 20 : केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यामध्ये कला शाखेतून बीए पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्यातील मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे, हा उद्देश आहे. माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करीत नाहीत. त्यामुळे आंध्र विद्यापीठासोबत झालेल्या कराराव्दारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापीठाव्दारे कला शाखेतून बीए पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली असून इच्छुक माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

पात्रता व अटी

            पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण अथवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्समार्फत प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असावे. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. तसेच अर्जदार दि. 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाचा अभ्यासक्रम (2 वर्ष बारावी आणि 3 वर्ष पदवी) लागू राहील. या अभ्यासक्रमाचे शुल्क 12 हजार 500 रूपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोंबर महिन्यातच संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars/publications पहावे किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...