Monday, April 3, 2023

“ सामाजिक न्याय पर्व ” चे थाटात उद्घाटन संपन्न

 



 सामाजिक न्याय पर्व ” चे थाटात उद्घाटन संपन्न

  अमरावती, दि. 3 : एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तीं यांची जयंती असुन 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि. 1 एपिल 2023 ते 1 मे 2023 या  महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘ सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे.

या उपक्रमा अंतर्गत दि. 1 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे सामाजिक न्याय पर्वाचे उदघाटन थाटात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन प्रादेशिक उपायुकत,समाज कल्याण विभाग, सुनिल वारे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जया राऊत  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, राजेंद्र जाधवर, सहायक संचालक, वित्त व लेखा, समाज कल्याण विभाग, श्री. मेटकर तसेच सहायक आयुक्त,समाज कल्याण, माया केदार  उपस्थित होते.

उदघाटकीय संबोधनामध्ये  सुनिल वारे यांनी सन 2022-23 या वर्षातील विभागास प्राप्त झालेला निधी विभागाने 100 टक्के खर्च केला त्या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले व याच प्रकारे सदरचा उपक्रम मोठया प्रमाणात यशस्वी करावा असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, माया केदार यांनी  केले.  तर आभार प्रदर्शन श्री. गरुड यांनी केले.

 

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...