Monday, April 10, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावतीत आगमन

 






उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावतीत आगमन

 

        अमरावती दि. १० :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले.

      खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, प्रताप अडसड,  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदींनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

त्यानंतर ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथी कार्यक्रमास रवाना झाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ तसेच 'पीएम मित्रा' टेक्स्टाईल पार्कचे भुसंपादन, मराठी भाषा विद्यापीठाबाबत  महत्वपूर्ण बैठका होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...