महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चालविण्यासाठी संस्था, व्यवस्थापनाकडून अर्ज मागविण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

 महाराष्ट्र राज्य  कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम

चालविण्यासाठी संस्था, व्यवस्थापनाकडून अर्ज मागविण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

 

अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र राज्य  कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थाकडून, व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाचे संकेतस्थळ www.msbsde. वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्त्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम, तुकडी सुरू करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा. तसेच संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याकडे प्रस्तावाच्या 3 नस्ती दि. 30 एप्रिल 2023 पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे सचिव यांनी पत्राकाद्वारे केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती