Thursday, April 13, 2023

जिल्ह्यात 75 ग्रा. पं. मधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक - प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 


जिल्ह्यात 75 ग्रा. पं. मधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

-       प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 

अमरावती, दि. 13 : निधन, राजीनामा, अर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यांतील  75 ग्रामपंचायतींमधील 114 सदस्य व दोन थेट सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

 कार्यक्रमानुसार, मंगळवारी (18 एप्रिल) तहसीलदार निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा कालावधी दि. 25 एप्रिलपासून ते दि. 2 मेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वा. असा आहे. त्यात दि. 29 एप्रिल, दि. 30 एप्रिल व दि. 1 मे रोजी सार्वजनिक सुट्ट्यांमुळे नामनिर्देशन दाखल करता येणार नाही.

नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 3 मे रोजी सकाळी 11 वाजतापासून ती संपेपर्यंत करण्यात येईल. नामनिर्देशन दि. 8 मे रोजी दुपारी 3 वा. पर्यंत मागे घेता येतील.  निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी दि. 8 रोजी दु. 3 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. या निवडणुकीचे मतदान दि. 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल दि. 19 मे रोजी जाहीर करण्यात येईल. निकालाची अधिसूचना दि. 25 मे रोजी प्रसिद्ध होईल.

 

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...