Tuesday, February 20, 2018

भारतीय वनसेवा परिक्षेत १५ मराठी उमेदवार उत्तीर्ण                     
नवी दिल्ली दि. २० : भारतीय वनसेवेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ११० उमेदवार या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यात महाराष्ट्रातील १४ उमेदवारांचा समावेश आहे.

          केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेच्या आधारावर फेब्रुवारी २०१८ मध्ये या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यासंदर्भातील निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यानुसार देशभरातून एकूण ११० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

                                                  निरंजन दिवाकर गुणवत्ता यादीत तिसरा
        गुणवत्ता यादीत पहिल्या १० मध्ये महाराष्ट्रातील २ उमेदवारांचा समावेश असून निरंजन सुभाषराव दिवाकर तिस-या तर सुमीतकुमार सुभाषराव पाटील ७ व्या स्थानावर आहे. याशिवाय काजोल(११), श्रीनिवास विनायकराव पाटील (२८), संदीप हिंदुराव सुर्यवंशी (३८), निखील दशरथ थावळ (४६), सुदर्शन गोपीनाथ जाधव (४७), कस्तुरी प्रशांत सुळे (५६), राहुल किसन जाधव (६८), प्रशांत बाजीराव पाटील (६९), अमील लक्ष्मण शिंदे (७३), सतीश अशोक गोंधळी (७९), अक्षय बाळू भोरडे (९५), शंशाक सुधीर माने (१००) आणि  राहुल गजबिये (१०२) यांचा समावेश आहे.  
             एकूण उत्तीर्णांमध्ये ४६ उमेदवार खुल्या प्रवर्गातील, ४० इतर मागास वर्गीय, १६ अनुसूचीत जाती तर ८ अनुसूचीत जमाती प्रवर्गातील आहेत. यातील ३ उमेदवार हे दिव्यांग आहेत.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...