Friday, February 9, 2018


दिलखुलास कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची राज्यातील सहकारी संस्थांचे सक्षमीकरण या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत शनिवार दि. 10 आणि सोमवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चैागुले -शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सहकार विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अटल महापणन अभियान, सहकारी संस्थाची ग्रामीण भागाच्या विकासातील भूमिका आणि लोकाभिमुख वाटचाल तसेच विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे. 

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...