प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
महाराष्ट्राला १२ हजार १२३ घरे

नवी दिल्ली, ८ : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील १३ शहरांमध्ये एकूण १२ हजार १२३ परवडणारी घर बांधणीस केंद्राने मंजुरी दिली आहे.
            केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या केंद्रीय देखरेख व मंजुरी समितीच्या ३० व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या समितीने देशात १ लाख ८६ हजार ७७७ परवडणा-या घरांना मंजुरी दिली. महाराष्ट्रासह हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात , बिहार, केरळ, उत्तराखंड  आणि ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे.
        या समितीच्या मंजुरीनुसार महाराष्ट्रात एकूण १२ हजार १२३ परवडणारी घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ८६८ कोटींच्या गुंतवणुकीसह १८२ कोटींचे सहाय देण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजने(शहरी)अंतर्गत लाभिर्थीच्या बांधकामासाठी देशातील १ लाख ८ हजार ९५ घर बांधणीस मंजुरी देण्यात आली असून यात महाराष्ट्रासाठी हजार ८८ घर बांधणीस मंजुरी मिळाली आहे.

००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती