इमारत बांधकाम कामगारांसाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजना
महाराष्ट्रातील 25 लाख इमारत बांधकाम नोंदणीचे लक्ष्य
कामगार विभागाने पूर्ण करावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 23 :महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
सहयाद्री अतिथीगृह येथे आज विशेष नोंदणी अभियानाचा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तसेच वेबकास्टदवारे नागपूरहून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीहून पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील या अभियानात जोडले गेले होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, इमारत बांधकाम कामगार उंच उंच इमारती तयार करण्यात आपला महत्वाचा सहभाग देतात. पण त्यांचे जीवन नेहमीच दुर्लक्षित राहते. आज जाहीर करण्यात आलेली अटल विश्वकर्मा सन्मान योजना महाराष्ट्रातल्या 25 लाख कामगारांपर्यंत पोहोचणार आहे.या अभियानाअंतर्गत जाहीर करण्यात आलेलया 28 योजनांचा फायदा अधिकाधिक कामगारांनी घ्यावा असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी योवळी केले.
पूर्वीच्या काळी माणसांच्या रोटी, कपडा और मकान अशा तीन मुलभूत गरजा असतात असे म्हटले जायचे पण आता कालानुरुप पढाई, दवाई और कमाई यासुध्दा तितक्याच महत्वाच्या गरजा आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्याबरोबरच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 जून 2017 पासून लागू करण्यात आली असल्याचे श्री. फडणवीस यांनी योवळी सांगितले.
25 लाख बांधकाम कामगारांची नोदंणी करताना सर्व विभागांनी सहकार्य करावे तसेच 23 फेब्रुवारी ते 23 मार्च या 1 महिन्यात मोठया प्रमाणावर कामगारांची नोंदणी कशी होईल, कामगार नोंदणीमध्ये कुठला जिल्हा मागे राहणार नाही याची काळजी कामगार विभागाने घ्यावी अशा सूचनाही यावेळी केल्या.

येणाऱ्या काळात राज्याचे कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य याबाबत धोरण कसे असेल याबाबतच्या धोरणाचे प्रारुप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

यावेळी कामगार मंत्री यांनी कामगारांची नोंदणी विशेष नोंदणी अभियानअंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, आणि अमरावती येथील 96 ठिकाणी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी, जमा उपकर, कल्याणकारी योजना यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे.


इमारत बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी
•          इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
•          18 ते 60 वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार
•          इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मुळ व्याख्येत समाविष्ट 21 बांधकामावरील बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.
•          विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी ठरविण्यात आली असून ती 25 रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी 1 रुपया आणि 60 रुपये पाच वर्षांसाठी आहे.

नोंदणीकरिता लागणारी कागदपत्रे
•          गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
•          वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्मप्रमाणपत्र)
•          पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्रे
•          रहिवासी पुरावा
•          छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा
•          बँक पासबुकची सत्यप्रत
लोकप्रतिनिधी, कामगार संघटना आणि आस्थापना, स्वयंसेवी संस्था, यांनी विशेष नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात सहकार्य करावे. तसेच विविध योजनांच्या लाभाकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन कामगार विभागाचे प्रधान सचिव  राजेश कुमार यांनी यावेळी केले.
यावेळीकामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, विकास आयुक्त पंकज कुमार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीरंगम आदी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती