विकासाच्या क्षेत्रातील संधी शोधून एकत्रित समृद्ध होऊ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांचे मुख्यमंत्र्यांकडून भारत भेटीसाठी स्वागत

मुंबई, दि. 20: भारत भेटीवर आलेल्या कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. विकासाच्या क्षेत्रात संधी शोधून एकत्रित समृद्ध होऊ, असा विश्र्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी झालेल्या चर्चेत व्यक्त केला.
हाटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि प्रधानमंत्री श्री. ट्रुडो यांची औपचारिक चर्चा संपन्न झाली. मुख्यमंत्री म्हणाले, कॅनडा सोबतचे संबंध नेहमीच सशक्त राहीले आहेत. यापुढेही ते आणखी दृढ होतील असे प्रयत्न केले जातील. विशेषतः आर्थिक सुधारणाच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी सहकार्य घेतले जाईल. कॅनडातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शविली आहे. यातून येणाऱ्या गुंतवणूकीचे आणि विकासाच्या विविध संधीचे स्वागत करतो. यातून परस्पर सहकार्य आणखी वाढीस लागून विकासाच्या क्षेत्रातील संधीद्वारे समृद्ध होऊ, असा विश्र्वास वाटतो.
कॅनडाचे प्रधानमंत्री श्री. ट्रुडो म्हणाले, कॅनडा आणि भारताचे सौहार्द संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणाच्या क्षेत्रातील वाढीसाठी कॅनडा निश्चितच सहकार्य करेल.
याप्रसंगी मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रविण सिंह परदेशी, आयटी विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन तसेच कॅनडाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळातील सदस्यही उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती