टीआयई ग्लोबल समिट
फाईव्ह ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राचा वाटा
वन ट्रिलीयन इकॉनॉमी असेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 21: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत भारत फाईव्ह ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी बनेल असा विश्वास व्यक्त केला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा वन ट्रिलीयन इकॉनॉमी राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
आज जे डब्लयू मॅरिट येथे टीआयई ग्लोबल समिट आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी देश आणि राज्यभरातून आलेल्या उदयोजकांशी संवाद साधला.
या समिटमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कालच राज्याच्या औदयोगिक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 चा समारोप झाला. जागतिक स्तरावर गुंतवणूक आर्षित करण्यासाठी राज्यात मेक इन इंडियानंतर अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात आली होती. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकूण 4 हजारहून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. तीन दिवसांमध्ये एकूण 16लाख कोटी रुपयांच्या उदयोगांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याने महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे उदयोजकांसाठीचे पहिल्या पसंतीचे राज्य असून गेल्या वर्षी देशाच्या परकीय थेट गुंतवणकीपैकी महाराष्ट्रात एकूण 51 % गुंतवणूक आली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि इज ऑफ डुईंग बिझनेस यामधील सुलभता यामुळे अधिकाधिक उदयोजक महाराष्ट्रात गुंतवणूक करतील. आज भारताकडे असलेले कुशल मनुष्यबळ, बुध्दी याचा वापर वाढविण्यासाठी आगामी काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर शिर्डी विमानतळानंतर पुणे आणि नागपूर येथे अतिरिक्त विमानतळाच्या कामालाही गती देण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गुंतवणकीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 13 नवीन धोरणे जाहीर
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात गुंतवणकीला प्रोत्साहन मिळावे, मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य शासनाने वेगवेगळी 13 नवीन धोरणे जाहीर केली आहेत. यात लॉजिस्टिक पार्क, वस्त्रोदयोग धोरण, फिन्टेक पॉलीसी, स्टार्ट अप पॉलीसी यांचा समावेश आहे.पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर आणि अहमदनगर येथे अदययावत औदयोगिक वसाहत उभारण्यात येत आहे. याशिवाय उदयोग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या एकत्रितपणे मिळाव्यात यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस यावर भर देण्यात येत आहे. आज महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप धोरणाला प्रोत्साहन देत असून यामुळे राज्यात नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.



पायाभूत सुविधांवर भर देणार
भारतात आलेल्याएकूण प्रकल्पापैकी महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पाचे एकूण 51 टक्के प्रमाण आहे.आज मुंबई ही सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पायाभूत सुविधातून विकास साध्य करताना मुंबईत पायाभूत सुविधांचे जाळे येत्या काळात निर्माण करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने 258 किमीचे मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सी लिंक, कोस्टल रोड, रो रो सर्व्हिस यामुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी या समिटमध्ये सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती