Tuesday, February 20, 2018

'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
इंडस्ट्री 4.0 व भविष्यातील रोजगार
इंडस्ट्री 4.0 मुळे रोजगाराच्या असंख्य संधी

            मुंबई, दि.19 : रोजगाराच्या संधी या केवळ उद्योग क्षेत्रातच आहे असे नाही. सेवा, व्यवसाय, ब्रँडिंग, पुरवठा या सोबतच शेती क्षेत्रात सुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची सर्वच क्षेत्राला आवश्यकता आहे. देशात सध्या उद्योगाला पूरक वातावरण असून इंडस्ट्री 4.0 ळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होतील असा सूर मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हेर्जेन्स 2018 या गुंतवणूकदारांच्या परिषदेत इंडस्ट्री 4.0 व भविष्यातील रोजगार या विषयावरील चर्चा सत्रात निघाला.
            या चर्चासत्रास शिशिर जोशपात्रा, उन्मेष पवार, ट्रोन्ड ब्रेडसेन, सुमित्रो घोष, माधव चंचाणी व पराग सातपुते प्रमुख वक्ते म्हणू उपस्थित होते.उद्योगाच्या विकासासाठी व वाढीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असून सरकार कौशल्य प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हा रोजगाराच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो अशी भीती काही वक्त्यांनी व्यक्त केली.
            अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीत काही बदल करणे काळाची गरज आहे. उद्योग व्यवसायाला लागणारे कौशल्य अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावीत. काही उद्योग समूहांनी त्यांना लागणारे स्किल मॅन पॉवर मिळावे म्हणून विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू केल्याचे या चर्चा सत्रात सांगण्यात आले. भारतात दरवर्षी तीन कोटी नवीन वाहनस्त्यावर येत असतात. या वाहनांसाठी असलेल्या सर्विसिंग सेंटर साठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. युवकांनी ही कौशल्य आत्मसात केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात सुद्धा रोजगाराच्या संधी आहेत. पारंपारिक शेती पेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेती पूरक व्यवसाय या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा सूर या चर्चा सत्रात निघाला.या चर्चा सत्राचे सूत्र संचलन माधव चंचणी यांनी केले.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...