Monday, February 5, 2018

सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून
देण्यासंबंधी समिती स्थापन करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून दयावी. यासाठी महाऊर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग विभागाच्या बैठकीत दिली. यावेळी  वस्त्रोदयोग मंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित होते
वस्त्रोद्योग विभागातर्फे सचिव वस्त्रोद्योग अतुल पाटणे यांनी यावेळी विस्तृत  सादरीकरण केले.
राज्यात 132 सूत गिरण्या असून वस्त्रोद्योगाचा मुख्य घटक असलेल्या सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षमपणे चालू शकतात. पारंपरिक ऊर्जेसोबतच सौर उर्जा व अन्य स्त्रोतांव्दारे वीज उपलब्ध्‍ा करून देण्यासंदर्भात समितीने अहवाल सादर करावा. सूत गिरण्या, साखर उद्योग, रेशीम विकास यांना लागणाऱ्या कुशल व तांत्रिक प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्वतंत्र संवर्ग करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी वस्त्रोद्योग विभागाला दिले.
कापुस उत्पादक जिल्ह्यातच वस्त्रोद्योग वाढीला प्रोत्साहन देण्यात यावं. तसेच पारंपारिक धागा निर्मितीसोबतच अंबांडी, केळी, बांबू यापासून तयार होणाऱ्या धागा निर्मिती संदर्भात ही संशोधन करण्यात यावे. तसेच टेक्सटाईल युनिव्हसिर्टी बाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल,उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...