आय ओटी आणि स्मार्ट सिटी परिसंवाद

देशाची स्मार्ट सिटीकडे वाटचाल !


मुंबई, दि. 19 :  विज्ञान-तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासन यांचीसुयोग्य सांगड घालून नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्याच्या उद्दिष्टाने केंद्र शासनाने देशातील 100शहरांना स्मार्ट शहरे बनविण्यासाठीमहत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलीअसून देशाची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.               
येथील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स मैदानावर आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्‌व्हर्जन्स-2018’  निमित्त आयओटी आणि स्मार्ट सिटीया विषयावरील परिसंवादात सुरेश सुबुध्दी, दिना तमामी,  अभिषेक लोढा, जॉय राजन, श्रीवत्स कुम्मीशेट्टी आणि ब्रिजेश सिंह यांनी विचार मांडले.
या वेळीसुरेश सुबुध्दी म्हणाले सन1991 मध्ये स्वतंत्र झालेल्या युरोपमधील एस्टोनिया हा छोटा देश स्मार्ट झाला आहे. या देशात सुम99टक्के सेवा या डिजिटल स्वरुपात नागरिकांना पुरविल्या जातात. या देशातील नागरिकांच्या सहभागाने या देशाने एवढया कमी कालावधीत आपल्या देशाला स्मार्ट बनविले आहे. एस्टोनिया सारखा छोटा देश जर स्मार्ट होऊ शकतो तर महाराष्ट्रातील शहरे देखील स्मार्ट होऊ शकतात. स्मार्ट सिटी संकल्पना यशस्वीरित्या राबविण्याकरीता दोन्ही बाजूंचा संवाद आणि प्रयत्न आवश्यक आहे.
बांधकाम क्षेत्रातील उद्योजक अभिषेक लोढा म्हणाले, आज सर्वत्र स्मार्ट सिटीची संकल्पना सुरु अस, नागरिकांचे देखील स्मार्ट सिटी बद्दलचे आकर्षण वाढत आहे. याकरीता मुलभत भौतिक सुविधा लक्ष केंद्रीत करुन अद्यवत सुविधा पुरविण्याकडे आमचे लक्ष्य असल्याचे सांगून त्यांनी निर्माण केलेल्या पलावा सिटीचे उदाहरण दिले.
दिना तमामी यांनी स्मार्ट सिटी निर्माण करताना नागरिकांच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांना सर्व सुविधा डिजिटल स्वरुपात पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीची आखणी तयार करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. लार्सन ॲन्ड टुर्बोचे जॉय राजन म्हणाले की, स्मार्ट सिटी हा विषय पूर्णत: संकल्पना बदलविणारा आहे. देशातील 100 शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. पहिल्या टप्प्यात जयपूर या शहराला देशातील पहिले स्मार्ट सिटी तयार करण्याचे काम करीत आहोत. स्मार्ट सिटी संकल्पना राबवितांना सर्वप्रथम महत्वाचे प्रश्न काय आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. येणाऱ्या दशकात भारताचा स्मार्ट कंट्रीमध्ये समावेश होईल, असेही मत जॉय राजन यांनी यावेळी व्यक्तकेले.
आयबीएम कंपनीचे श्री. कुमीशेट्टी म्हणाले की, स्मार्ट सिटी संकल्पना राबविताना सायबर सुरक्षा सर्वात महत्वाचा विषय आहे. दर3ते 4महिन्यामध्येतंत्रज्ञानात अद्यावतीकरण होत आहे. त्यानुसार आपल्या यंत्रणेचे देखील अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे स्वरुप बदलले की तंत्रज्ञान बदलावे लागते. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे  इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की, त्यावर आपला विश्वासही बसत नाही. इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी) हा त्याचाच एक नवा प्रकार. ज्यामध्ये मशीनचा मशीनशी संवाद होतो आणि मानवाची कित्येक कामे सहजसोपी होतात. इंटरनेटचा वापर केवळ मोबाईल फोनद्वारे केला जातो, असं नाही तर घरातील वस्तू, वाहने, इमारती आणि इतर अनेक वस्तूंसाठीही केला जातो.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअर इंडियाचे अल्केश शर्मा म्हणाले की, स्मार्ट सिटी संकल्पना राबविण्याकरीता नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे आहे. यावेळी श्री. शर्मा यांनी सादरीकरणांद्वारे नवी मुंबई आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा बीडकीन स्मार्ट सिटीचा प्लॅन दाखवला. याठिकाणी उपलब्धभौतिक सुविधवाहतूक आणि गतीशीलता, पाणी वितरण, वीजनिर्मिती आणि वितरण, पायाभूत सुविधांसाठी निधी या विषयाबरोबरच सामाजिक सुविधा, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास, जीवनस्तर संस्कृती, मनोरंजन, इत्यादीपर्यावरणआणि साधने, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हरित तंत्रज्ञान, शहर आणि साधने व्यवस्थापन, वायू-पाणी प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, जमीन धोरण, तंत्रज्ञान व शासन, सुरक्षा व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, परस्पर संवाद, विश्वसनीय आणि प्रमाणबद्ध तंत्रज्ञान या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती